वादळी वारा, पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी व काही फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपाचे अमोल शिंदे यांनी आज बुधवारी दि. ५ जून रोजी नगरदेवळा व नगरदेवळासीम या शिवारांत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
स्थानिक प्रशासनाला संपर्क करत तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी अशी मागणी केली. शेतकरी अत्यंत संकटात सापडले असून तयार झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. केळी घड कापणीला आलेली झाडे वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावुन घेतला गेला आहे. पाचोरा-भडगांव तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी त्यांचा पुत्र शेतकरी पुत्र म्हणून मी सदैव त्यांच्या सोबत असेल असे अमोल शिंदे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले.