पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील सिद्धी कुलकर्णी आणि धनश्री कुलकर्णी या दोन बहिणींनी अँड टीव्ही आणि ब्लू बेरी इंटरनॅशनल ग्रुपतर्फे आयोजित इंडिया सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा गाजवली. प्रथम क्रमांक धनश्रीने पटकवला. तिला रोख 50000/- रुपये , गोल्डन ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळाले. सिध्दी कुळकर्णीला टॉप 10 मध्ये ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळाले. त्या विनोद कुलकर्णी यांच्या कन्या आहेत .
अँड टीव्ही आणि ब्लू बेरी इंटरनॅशनल ग्रुपतर्फे इंडिया सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा 3 महिन्यापासून सुरू होती , प्रथम राउंड ऑनलाईन झाला त्यात सिलेक्शन होऊन दुसरा राउंडदेखील ऑनलाईन प्लेन व्हॉइस घेण्यात आला 860 स्पर्धकातून 20 टॉप सिंगर निवडले गेले त्यांना दिल्ली येथे 13 नोव्हेंबरला प्रत्यक्ष निवडसाठी बोलवण्यात आले त्यातून टॉप 16 बेस्ट सिंगर निवडण्यात आले देशभरातून निवडलेल्या 16 गायिकांमध्ये पाचोरा येथील दहावीला असलेली सिद्धी आणि आठवीला असलेल्या धनश्री कुळकर्णी या दोन्ही बहिणींची दिल्ली येथे सेमिफायनलमध्ये निवड झाली इंडिया सिंगिंग सुपरस्टार या स्पर्धेची फायनल लखनऊ येथे 26 डिसेंबरला घेण्यात आली महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राज्यस्थान, पंजाब, उत्तराखंड, मध्यप्रदेश, आसाम, दिल्ली, बिहारमधून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून 16 स्पर्धक फायनलसाठी निवडले गेले . या कार्यक्रमाचे प्रसारण पुढिल महिन्यात & TV- HD वर होणार आहे
विनोद कुळकर्णी यांच्या या दोन्ही मुलींमध्ये सिद्धि मोठी तर धनश्री ही लहान ! दोन्ही बहिणींना लहानपणापासूनच संगीत ऐकणे व सतत नवीन जुने गाणे गुणगुणने आवडायचे.सिद्धी ४ थीला असताना व धनश्री २ रीला असताना मिनाक्षी शर्मा यांच्याकडे सारेगमचे धडे गिरवायला सुरुवात केली. दररोज २ तास सराव करणाऱ्या सिद्धी आणि धनश्रीला विनोद कुळकर्णी यांनी हार्मोनियम, इलेक्ट्रॉनिक तबला , माईक, साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिले त्यांनी संगीताच्या चार परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या.
१० वर्षांची असताना गोदावरी फाउंडेशन (जळगाव ) संगीत स्पर्धेत धनश्रीने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला अहमदनगर येथे राज्यस्तरीय भावगीत व भक्ति गीत स्पर्धेत दोघींनी चुणूक दाखवून दाद मिळवली. कोरोनाकाळात अनेक ऑनलाईन स्पर्धेत त्यांनी पारितोषिक प्राप्त केले. जळगांव येथील मु.जे. महाविद्यालयाच्या कान्ह ललित केंद्र तर्फे गणपती उत्सवात ऑनलाईन स्पर्धेत धनश्रीने प्रथम क्रमांक पटकावला होता चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण फाउंडेशनच्या ऑनलाईन आषाढी एकादशी निमित्ताने भक्तीगीत स्पर्धेत दोघींनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले होते .