पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील मूळ रहिवासी सचिन पाटील ( केंद्रप्रमुख , गोंदेगाव ) यांचे पुतणे व सध्या पुणे विद्यापीठ येथे कार्यरत असलेले प्रा नितीन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी पाचोऱ्याचे नाव ज्युनिअर ऑलम्पिक रोप स्कीपिंग स्पर्धेत गाजवले
अमेरिकेतील होस्टन येथे पार पडलेल्या या ऑनलाइन स्पर्धेत भार्गव पाटील याने भारताकडून खेळताना 1 सुवर्ण व 1 रौप्य पदक मिळवतांना जागतिक क्रमवारीत चौथे स्थान पटकावले. त्याचा भाऊ शिवम पाटील याने जागतिक क्रमवारीत 5 वे स्थान पटकावले दोन्ही भावंडांनी पाचोऱ्याचे नाव गाजवून भारताचा जागतिक क्रमवारीत झेंडा रोवला त्यांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.