पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील रांगोळी कलाकार तसेच निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी यांना बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड कोल्हापूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला. शैलेश कुलकर्णी हे मागील ५ ते ६ वर्षांपासून रांगोळी कलेमध्ये कार्य करत आहे. त्यांनी आतापर्यंत २००-३०० पोस्टर रांगोळी कलाकृती साकारल्या आहेत. या मधून ते समाजप्रबोधन कार्य देखील करत असतात.
अनोमोर्फिक रांगोळी,पोस्टर रांगोळी, ३ डी रांगोळी, टू इन वन रांगोळी, परमनंट रांगोळी ई. प्रकार ते रांगोळीतून रेखाटत असतात. या पूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या रांगोळी कलेची दखल एशियन बुक ऑफ रेकॉर्ड , इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे. तसेच त्यांनी ४० बाय ६० पासून ते १०० बाय १५० फूट एवढ्या भव्य आकाराच्या रांगोळ्या देखील रेखाटल्या आहेत.