पाचोरा,जि.जळगाव (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचार, बलात्कार, मृत्यू आणि मृत्यूनंतर अन्यायग्रस्त मुलीच्या कुटुंबाची उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने केलेली क्रूर चेष्टा यासंदर्भात पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दि. २ ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आम्हाला हे दुर्दैवी निवेदन द्यावे लागत आहे याचे अतीव दुःख असल्याची भावना कारकर्त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली.
निवेदनात म्हटले आहे की, दि. 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या बुल गढी या गावातील 19 वर्षीय दलित मुलीवर चार नराधमांनी अमानुषपाने अत्याचार केले असून नराधमांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना माजी आ. दिलीप वाघ, सोबत तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी, नगरसेवक विकास पाटील, बशीर बागवान, रसूल चाचा, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भूषण वाघ, नाना देवरे, सुभाष पाटील, डॉ. पी. एन. पाटील, जगदीश सोनार, अजहर खान, सिताराम पाटील, रणजीत पाटील, अविनाश सुतार,सुचेता वाघ, सरला पाटील, नीलिमा पाटील, सुनीता मांडोळे, जयश्री मिस्तरी, अजय अहिरे, बारकू पाटील, धर्मां पाटील, प्रकाश पाटील , ज्योतिष परदेशी, संतोष परदेशी, रज्जाक शेख, विलास सोनवणे, अभिजित पवार, सागर अहिरे, पंकज गढरी, चंद्रकांत पवार, गिरीश पाटील, संतोष परदेशी, ईश्वर परदेशी, भगवान परदेशी, संजय पाटील, प्रेम राज पाटील, शालीग्राम पाटील, एकनाथ पाटील, संजय करंदे, जनार्दन पाटील, नितीन पवार, बाबाजी पाटील, नाना पाटील, पुरुषोत्तम पाटील, रशीद मणियार, विनोद पाटील, सुनील पाटील, विक्रांत पाटील, सागर भोसले, किशोर पडवळ, बजरंग पाटील, किशोर पाटील, गोकुळ पाटील, निलेश पाटील, गौरव पाटील, चेतन पाटील, करण सूर्यवंशी, सुनील पाटील, अरुण पाटील, भगवान मिस्त्री, रोहित येवले, महेश माळी, सागर महाजन, गौरव , सागर भोसले, कमलेश अहिराव, विनोद पाटील, रशीद शेख, विनोद सुभाष पाटील, विक्रांत पाटील चेतन पाटील उमेश पाटील, लखन वाघ वाजिद बागवान, महाराज, कमलेश नोथवाणी आदी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









