पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आर्वे शिवारातील शेतात ३२ वर्षीय शेतमजुराने शेतातील विषारी औषध घेतल्याने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दिनांक २२ जून रोजी सकाळी १० वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुनील सुखरिया बारेला (वय-३२, रा. कोठा खुर्द ता. खरगोन मध्य प्रदेश) असे मयत परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. सुनील बारेला हा तरुण परिवारासह पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात वास्तव्याला होता. गणेश भावसार यांच्या शेतात काम करून तो उदरनिर्वाह करत होता. आई, वडील पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान त्याने शनिवारी २२ जून रोजी पहाटे ५.३० वाजता पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले.
त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी दिनांक २२ जून रोजी सकाळी १० वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे