पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे दि. २१ जून रोजी सकाळी जागतिक योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गो.से. हायस्कूलमधील योगाशिक्षक डी.डी. कुमावत यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच योगाचे विविध आसन व त्यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
याप्रसंगी उपस्थित असलेले तालुका गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील व योगाशिक्षक डी.डी.कुमावत यांचा मुख्याध्यापिका पी. एम.वाघ यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. जवळपास १ हजार विद्यार्थी, ६५ शिक्षक व ५० पालकांनी या योगा दिवसांमध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी शाळेचे उप मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे , पर्यवेक्षक आर. एल.पाटील, पर्यवेक्षिका ए.आर.गोहिल यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले. तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.