पाचोरा (प्रतिनिधी) – पिटीसी संचलित गो से हायस्कूल येथे पंधरा वर्षे वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले .
या मोहीमअंतर्गत गो से हायस्कूल येथे इयत्ता नववी व दहावीच्या 256 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्यावेळी संस्थेचे चेअरमन संजय वाघ. गो से हायस्कूलचे तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन , मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका पी एम वाघ , पर्यवेक्षक आर एल पाटील , एन आर ठाकरे, ए बी अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस एन पाटील , किमान कौशल्य विभागाचे प्रमुख मनीष बाविस्कर , सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आर बी तडवी , कार्यालय अधीक्षक अजय सिनकर उपस्थित होते
हे लसीकरण कर्मचारी व नर्स श्रीमती भारती पाटील , नमः साळुंखे, मनीषा गढरी, प्रतिभा पाटील, वैशाली लोखंडे, मनिषा अहिरे, वैशाली महाजन व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पार पाडले . सोशल डिस्टंसिंग ठेवत मास लावून पूर्ण काळजी घेऊन ही मोहीम पार पडली . लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतुहूल दिसून आले