पाचोरा शहरातील दुपारची घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील एक तरुणी व एका तरुणाने भर दुपारी नैराश्यातून आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
ललित राजाराम पाटील (वय २१, रा. मानसिंगका नगर, पाचोरा) हा परिवारासह राहतो. दुपारी त्याच्या घराजवळ असलेल्या साई मंदिरापाशी पंचायत समितीच्या क्वार्टरजवळ तो गेला होता. तेथेच छताला गळफास लावून त्याने आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजश्री वीरेंद्र पाटील (वय २१, राजीव गांधी नगर, पाचोरा) हिनेदेखील राहत्या घरी कोणीही नसताना कुठल्यातरी नैराश्याखाली येत आत्महत्त्या केली. दरम्यान, पोलीस घटनेची माहिती घेत आहे. पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक योगेश गणगे , सुनील पाटील,विनोद बेलदार,संतोष राजपूत, राहुल शिंपी,योगेश पाटील,संदीप पाटील,संदीप भोई,समीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.