उमेदवारांची वाढती स्पर्धा पाहून चुरस वाढणार
पाचोरा (प्रतिनिधी)– तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सोमवारी दि. २१ एप्रिल रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये प्रक्रिया पार पडली. यात एक द्वितीयांश सरपंच पदे महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्ग मध्ये दुसखेडा, अंतुर्ली बुद्रुक, अंतुर्ली खुर्द, याशिवाय खडकदेवळा खुर्द, पिंपरी बुद्रुक, नांद्रा, वेरूळी बुद्रुक हे ४ गावे महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्ग सरपंचपदासाठी कुरंगी, पहाण, सावखेडा बुद्रुक, वडगाव खुर्द, चिंचपूरे याशिवाय म्हसास, लोहारी बुद्रुक, वाणेगाव, पिंपळगाव बुद्रुक, ओझर, बदरखे हे महिला सरपंच पदासाठी राखीव आहेत.(केजीएन)नामाप्र म्हणजेच ओबीसीसाठी दहिगाव, निंभोरी बुद्रुक, सावखेडा खुर्द, साजगाव, कोल्हे, सारोळा खुर्द, डोंगरगाव, निपाणी, खडकदेवळा बुद्रुक, मोंढाळे, वडगाव कडे, वडगाव खुर्द प्रपा, हनुमानवाडी याशिवाय भोजे, वाघुलखेडा, वडगाव आंबे, अटलगव्हाण, तारखेडा बुद्रुक, शिंदाड, जारगाव, सामनेर, गाळण खुर्द, नाईकनगर, पिंपरी बुद्रुक वडगाव मुलाने, पिंपळगाव खुर्द, वेरुळी खुर्द हे गावे महिलांसाठी राखीव आहे.
तर सर्वसाधारण सरपंचपद यामध्ये आखतवाडे, आसनखेडा बुद्रुक, अंतुर्ली खुर्द प्रपा, बाळद बुद्रुक, बांबरुड खुर्द प्रपा, बांबरुड प्रबो, बिल्दी बुद्रुक, डांभुर्णी, डोकलखेडा, गाळण बुद्रुक, गोराडखेडा बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, लासुरे, लोहटार, माहेजी, मोहाडी, नाचणखेडा, पुनगाव, सारोळा बुद्रुक, सार्वे बुद्रुक प्रभ, सार्वे बुद्रुक प्रलो, टाकळी बुद्रुक, तारखेडा खुर्द, वडगाव बुद्रुक प्र. पा., वाडी, वरसाडे प्रपा, विष्णुनगर हे आहेत.(केजीएन)तर सर्वसाधारणमध्ये महिलांसाठी भातखंडे खुर्द, भोकरी, भोरटेक खुर्द, चिंचखेडा खुर्द, दिघी, घुसर्डी बुद्रुक, गोराडखेडा खुर्द, कळमसरा, होळ, कासमपुरा, खाजोळा, खेडगाव नंदीचे, कुऱ्हाड बुद्रुक, लासगाव, लोहारा, नगरदेवळा, नेरी, परधाडे, पिंपरी खुर्द प्रपा, राजुरी बुद्रुक, रामेश्वर, सांगवी प्रलो, सातगाव, शहापुरा, शेवाळे, वरखेडी बुद्रुक, वरसाडे प्रबो, वडगाव आंबे हे राखीव आहे.