पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे नवनियुक्त चेअरमन एकनाथ तावडे व व्हाईस चेअरमन मुकेश अग्रवाल यांचा सत्कार माजी आमदार दिलीप वाघ यांनी नुकताच केला .
या संस्थेची नुकतीच निवडणूक घेण्यात आली. चेअरमनपदासाठी एकनाथ तावडे व व्हाईस चेअरमनपदासाठी मुकेश अग्रवाल या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी व्हि एम जगताप यांनी चेअरमनपदी एकनाथ तावडे तर व्हाईस चेअरमनपदी मुकेश अग्रवाल यांची बिनविरोध निवड घोषित केली या निवडणुकीत पुनमचंद मोर , डी एम पाटील, सचिन कोठावदे, उमेश राका, रवींद्र देवरे कारखानदार बिनविरोध निवडून आलेले असून महिला मतदारसंघातून रेखा मथुरवैश्य , लता जैन व विक्रांत पेंढारकर हे राखीव मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत . इतर मागासवर्गीय मतदारसंघासाठी निवडणूक झाली भूषण दिलीप वाघ हे मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत
या पदाधिकार्यांच्या निवडीबद्दल पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला . राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष नितीन तावडे , तालुकाध्यक्ष विकास पाटील , सहकारी औद्योगिक संस्थेच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे