पाचोरा ( प्रतिनिधी ) – काहीवेळेस गावांमध्ये दुर्घटना घडल्यावर किंवा कुणाची प्रकृती गंभीर झाल्यावर तात्काळ जळगाव किंवा पाचोरा जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही त्यासाठी मतदारसंघात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका लोकार्पण करणार आहोत या रुग्णवाहिका फक्त जळगाव व पाचोरा तालुक्यातच जाण्यासाठी असतील. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी काल दिले.
नांद्रा येथील चार कोटी वीस लाख रुपयाच्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे त्याचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी आमदार किशोर पाटील बोलत होते नांद्रा परिसरातील खेड्याना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या नूतन वास्तूच्या उभारणीमुळे चांगली आरोग्य सेवा मिळेल. काल सकाळी आरोग्य केंद्र भूमिपूजन सोहळा पाचोरा- भडगावचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाला कुरंगी – बांबरुड गटातील जि प सदस्य पदमसिंह पाटील यांनी केलेले विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन झाले .प्राथमिक आरोग्य केंद्र भूमिपूजन, नांद्रा येथील शिवस्मारक चौक सुशोभीकरण, हडसन ते पहान रस्ता दुरुस्तीचे भूमिपूजन यासह पंचवीस कामांना टप्प्या-टप्प्याने सुरुवात होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील यांच्या जिल्हा विकास निधीतून सात कोटीची विकासकामे मंजूर झाली आहेत.
याप्रसंगी जि प सदस्य दीपकसिंग राजपूत, कृ. उ. बाजार समिती संचालक शिवदास पाटील, प्रा. समाधान पाटील, मनोज पाटील (सरपंच दुसखेडा ), भगवान पाटील ( सरपंच वेरुळी ), बबन पाटील ( सरपंच आसनखेडा ), योगेश पाटील (सरपंच डोकलखेडा ), हिरालाल पाटील ( सरपंच हडसन ), वाल्मीक पाटील ( सरपंच पहान ), जगन पाटील ( सरपंच वरसाडे ), विनोद तावडे (सरपंच नांद्रा ) ,सुभाष तावडे ( माजी सरपंच नांद्रा) ,शिवाजी तावडे ( उपसरपंच नांद्रा ) ,राजू भैया पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, युवराज काळे, माजी सभापती पंढरी पाटील, साहेबराव पाटील, सुनील पाटील, शशी महाजन, आबा महाजन, ग्रामपंचायत सदस्य पप्पू सूर्यवंशी, बंटी सूर्यवंशी, किशोर खैरनार, विनोद पाटील ( महिजी) ,राजू दादा (हडसन), शरद पाटील, बाळकृष्ण साळुंखे (उपसरपंच सामनेर) , महेंद्र साळुंखे, विजू पाटील (उपसरपंच गोराडखेडा) , सागर पाटील, कैलास पाटील, विलास पाटील, विलास जिभाऊ (पहन), बालाजी पाटील, पका नाना, संजय जगन , निलेश पाटील, सखाराम पाटील, दिलीप सूर्यवंशी अजय जयस्वाल, नागराज पाटील, दिलीप पाटील, जावेद शेख, टिनू भाऊ, अतुल पाटील ( दहिगाव परिसरातील पत्रकार , सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉक्टर व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन विनोद बाविस्कर यांनी केले सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार व पंकज बाविस्कर यांनी केले.