आमदार किशोर पाटील यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा
पाचोरा ( प्रतिनिधी ) – रब्बीत अवकाळीने पाचोरा-भडगाव मतदारसंघात शेतकर्याचे नुकसान झाले. आता अतिवृष्टीतही खरीप हंगाम पुर्णपणे हातातून गेला. या दोन्ही तालुक्यातील शेतकर्याना 100 कोटी रूपये मदत मिळणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात नुकसान झाले होते. ते दुःख विसरून शेतकर्यानी खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीत खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे नुकसान झाले. शेतकर्यानी केलेला खर्च निघणेही मुश्किल झाले मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार , कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषाच्या तीनपट भरपाई द्यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अतिवृष्टीची पुर्वीच्या निकषापेक्षा अधिकची मदत जाहीर केली.
रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी जळगाव जिल्ह्याला 35 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी 19 कोटी 50 लाख भडगाव- पाचोरा तालुक्यांना मिळाले 18 कोटी एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला एक कोटी 31 लाख रुपये प्राप्त झाले त्याचे वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून सुरू आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. पाचोरा भडगाव मतदारसंघाला 50 टक्केपेक्षाही अधिक अनुदान मिळवण्यात आपल्याला यश आले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.
ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान पाचोरा भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 80 कोटी रुपये मिळणार आहे. पाचोरा तालुक्याला 50 कोटी तर भडगाव तालुक्याला 30 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. दोन-चार दिवसात तेही अनुदान प्रत्यक्ष प्राप्त होईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.
अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी अडचणीत होता. दिवाळी असुनही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. प्रत्यक्ष अनुदान वाटपाला सुरवात झाली आहे. दिवाळीपुर्वी अनुदान देऊ शकल्याचे मोठे समाधान आहे , असेही ते म्हणाले . .