पाचोऱ्याच्या शिक्षकाची हुबेहूब कलाकृती
पाचोरा (प्रतिनिधी) : सद्यस्थितीवर नवरात्रोत्सवानिमित्त आधारित गो.से.हायस्कूल, पाचोरा येथील कलाशिक्षक सुबोध कांतायन यांनी शाळेच्या दर्शनी भिंतीवरील फलकावर माँ दुर्गा चे रंगीत खडूने केलेले सुबक चित्र रेखाटले आहे. सोबतच लहान मुलगी देवींची मूर्तीच निरीक्षण करताना आपल्याला ती देवीच्या स्वरूपातच दिसून येते. देवी सारखेच मी सुद्धा दुष्कृत्य करणाऱ्यांचा नायनाट करेल जणू ते हे सांगतेच आहे.
देवीच्या चेहऱ्यावरील उजळ रंगछटा, आभुषणांवरील नाजूक अलंकरण, विविध रंगछटेतून निर्माण झालेली केशरचना, डोळ्यातील जिवंतपणा चित्रात जाणवतो. पण प्रत्यक्ष चित्र बघितल्यावर बघणारे सांगतात की , विचारांनी थैमान घातलेले मन, चित्र दर्शनाने शांत होते अन देवीच रूप बघून मन आनंदित होते . फक्त मनापासुन चित्राचाआस्वाद घेता आला पाहिजे. शाळेतील प्रत्येक घटकाच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील चित्र बघतानाचा आनंद बघुन कलाकाराला आपण केलेल्या कामाचे चीज झाले ही जाणीव होते.आज मुलीने स्वतःला माँ दुर्गा किंवा माँ काली समजूनच स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करावं. वासनाधारी या राक्षसांपासून हे रूपच तुमचं रक्षण करू शकतो हे या चित्रातून दिसून येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही. टी. जोशी, सचिव महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासू महाजन यांनी चित्राचे कौतुक केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल पाटील, पर्यवेक्षक ए. बी. अहिरे, ए. आर. गोहील, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, प्रितम पाटील, संगीता वाघ, ज्योती ठाकरे, प्रमोद पाटील यांनीही शुभेच्छा देऊन कौतुक केले.