पाचोरा (प्रतिनिधी) – येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात पाचोरा नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण पूरक अश्या साडेतीन लक्ष मात्र रकमेच्या २ इलेक्ट्रिक घंटागाडी वाहन खरेदी करण्यात आल्या. त्यांचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना वाहनाची चावी देऊन करण्यात आले. सदरचे वाहन हे ३ तास चार्जिंग केल्यानंतर १०० की. मी. चालते.
उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, आ. किशोर पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, खा. उन्मेश पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप वाघ जिल्ह्यातील आजी माजी आमदार, पदाधिकारी तसेच पाचोरा न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी उपस्थित होते.