पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधर मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध कामांचा शुभारंभ दिनांक 17 जुलै रोजी करण्यात आला.


यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष मा. आ. दिलीपजी ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव महेशजी देशमुख होते. त्यानंतर टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा विभागाकडून सेल्फी पॉईंट साकारण्यात आला होता. त्या पॉईंटद्वारे मान्यवरांनी सेल्फी घेऊन भारतीय खेळाडूंना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणावर वृक्षारोपण करण्यात आले.

त्याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुरेश देवरे, पूर्णपात्रे, डॉ. जयंत पाटील, प्रा. एस. झेड. तोतला, योगेश पाटील, सतिष चौधरी, भागचंद राका, वासुदेव महाजन, विजयराव देशपांडे, दत्तात्रय पवार, रणजीत पाटील, संजय सूर्यवंशी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, माजी उपप्राचार्य प्रा. शामराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. संजू एम. पाटील, प्रा. जे. व्ही. पाटील, प्रा. आर. एस. मांडोळे, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. पी. आर. सोनवणे, प्रा. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. ललित वाघ, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, प्रा. वाय. बी. पुरी, क्रीडा संचालक प्रा. गिरीश पाटील, प्रा. आर. बी. वळवी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. के. एस. इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







