पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव मतदार संघात शेतकरी हित जोपासणारी, राजकीय वर्चस्व गाजविणारी, आणि राजकीय पक्षाच्या दृष्टीने सहकाराचा कणा आणि राजकारणाचा बाणा असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदारसंघात सर्वसाधारण-(७), महिला राखीव- (२), इतर मागासवर्गीय- (१),भटक्या जातीजमाती- (१) अश्या एकूण- (११). जागा.ग्राम पंचायत मतदार संघ -सर्वसाधारण-(२),अनुसूचित जाती–(१), आर्थिक दुर्बल घटक- (१) एकूण- (४). व्यापारी मतदारसंघ-(२) तर हमाल मापाडी मतदारसंघ-(१) अश्या एकूण १८ जागेसाठी निवडणूक होणार आहे.
२७ मार्च पासून सुरू झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी आमदार किशोर पाटील, बाजार समितीचे मुख्य – माजी प्रशासकीय अधिकारी तथा माजी आमदार दिलीप वाघ,आणि आजी-माजी आमदारांना बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून शह देऊन सहकाराच्या राजकारणात प श्रीगणेशा करण्यासाठी माजी आमदार आर. ओ.तात्या यांच्या कन्या व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सौ. वैशालिताई सुर्यवंशी, भाजप-एकनाथराव शिंदे शिवसेना युतीचे सुभाष पाटील, मधुकर काटे, माजी शहर अध्यक्ष नांदूबापू सोमवंशी, राष्ट्रीय काँग्रेस तर्फे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, तर भाजपातील दुसरा गट यांनी दि.३ मार्चच्या नामांकनाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी समितीच्या १८ जागेसाठी पाचोरा- भडगाव मतदार संघातील , जुने- नवे, आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे नामांकन दाखल केले आहेत. सोसायटी सर्वसाधारण मतदार संघाच्या.जागांसाठी १०१,सोसायटी सर्वसाधारण महिला राखिव ( १४)
सोसायटी भटक्या विमुक्त जाती/ जमाती (१९)
सोसायटी इतर मागासवर्ग (१५),
ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदारसंघ (३३ ),
ग्रामपंचायतअनुसुचित जाती/जमाती(१५),
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक (१०) ,
व्यापारी मतदार संघ (२२ ), तर
हमाल मापाडी मतदार संघातुन (५) उमेदवारांनी असे एकूण ३४० नामांकन अर्जंपैकी मुदतीच्या शेवटच्या दिवशी २३४ संभाव्य उमेदवारांनी विविध पक्षांच्या वतीने नामांकन दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून तालुका सहाय्यक निबंधक ए. आर. सुर्यवंशी, सहा.राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मदतीला समिती सचिव श्री.बोरुडे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पहात आहे.