स्थानिक गुन्हे शाखा व पाचोरा पोलिसांची संयुक्त कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी)- बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतूसे घेवून फिरणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचोरा शहराला जोडणारा जळगांव चौफुली ते जामनेर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल नाईक, पोहेकॉ. विलास पाटील, दत्तु बडगुजर, पोलिस नाईक विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, सोपान पाटील, गनी तडवी, श्रीकांत ब्राम्हणे, पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी राहुल बेहरे, किरण पाटील या पथकाने सापळा रचुन शिताफीने इंडिगो कार अडवुन वाहन चालक सागर निवृत्ती गांगुर्डे (वय – २९) रा. शिरुर, ता. चांदवड जि. नाशिक – कार चालक, सागर आवण वांजोळे (वय – २३) रा. शिरुड, ता. चांदवड, जि. नाशिक, अमोल रमेश बुल्हे (वय – २५) रा. शिरसगाव लौकी, ता. येवला जि. नाशिक, राहुल विठ्ठल कराळे (वय – २५) रा. शिरेगाव ता. गंगापुर, जि. औरंगाबाद, देवचंद जगताप (वय – २४) रा. मरळगोई ता. निफाड, जि. नाशिक यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींकडे गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे, ७ मोबाईल, इंडिगो गाडी असा सुमारे ५ लाख ४५ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.
आरोपीच्या जवळ मिळुन १० हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी धातुचे काळी पिस्टल ग्रीप असलेले मॅगझीन असलेले आरोपी सागर निवृत्ती गांगुर्डे याच्या कब्जात मिळुन आलेले ३ हजार ५०० रुपये किंमतीचे ७ नग पिस्टलचे जिवंत काडतुस, ५ लाख रुपये किंमतीची (एम.एच. २७ ए.सी. २५५७) क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टाटा इंडीगो सी.एस. कार, १० हजार रुपये किंमतीचे दोन ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, १० हजार रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, १ हजार ५०० रुपयांचा एक नोकीया कंपनीचा मोबाईल फोन असा सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत केला आहे. सदर कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोरा पोलिस स्टेशनचे पो.कॉ.यशवंत घोरसे हे करीत आहे.