• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्या : अमोल शिंदे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्या : अमोल शिंदे

सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक प्रमुखाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पाचोरा (प्रतिनिधी) : खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस बियाणे सध्या बाजारांत उपलब्ध होत नसल्याने कापुस बियाण्याची टंचाई भासताना दिसत आहे.या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठवला असून प्रांताधिकारी यांना भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.

आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली. पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम लागवडीच्या तयारीला लागले असून आपल्या शेतीची मशागत करून लागवडी साठी त्यांना कापूस पिकांच्या बियाण्याची टंचाई भासत असल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काळात देखील दुष्काळ सदृश्य तालुक्याच्या नावाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल झाली आहे.

शेजारील चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी त्यांचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून घेण्याकरिता विशेष प्रयत्न करून जवळपास १३३ कोटीचे पॅकेज चाळीसगाव तालुक्याला मंजूर करून घेतले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना भरीवअशी मदत शासनाकडून मिळाली,परंतु येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त न करून घेता फक्त दुष्काळ सदृश्य घोषित झाला असल्याचे सांगत येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत. त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने फायदा झाला नसून येथील शेतकरी आजही मदतीच्या आशेवरच आहे. त्यात आता अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या ऐन खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नसल्याचे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने यासंदर्भात उपविभागीय अधिकारी पाचोरा व तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन याबाबतीत तात्काळ सूचना कराव्यात व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल अशा उपाययोजना करून तात्काळ बियाणे टंचाई दूर करावी अन्यथा सत्तेतील पक्षात असताना देखील पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पाटील, भडगांव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील,सरचिटणीस बन्सीलाल पाटील,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय पाटील , जिल्हा पदाधिकारी अरूण पवार, शहर सरचिटणीस समाधान मुळे, जगदिश पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकूर, युवा मोर्चा चिटणीस अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/pachora-bhadgaon-biyane-uplabdh/
Previous Post

८६४ रुपयांचे बियाणे विकले १ हजार २०० ला : दुकानदाराला रंगेहाथ अटक

Next Post

पाचोरा येथील गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा येथील गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी

पाचोरा येथील गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon