पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील शिवाई बहुउद्देशीय मंडळ संचलित नवीन माध्यमिक विद्यालय कुरंगी येथे विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन विविध नृत्य नाटिका सादर केल्या या संमेलनाचे उद्घाटन पाचोरा पीपलस बँकेचे चेअरमन श्री अतुल भाऊ संघवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती नितीन दादा तावडे कुरंगी चे माजी सरपंच योगेश दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर भाई खान सरपंच सो मनीषा गणेश पाटील उपसरपंच शालिक पवार सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र धनगर लोकमतचे पत्रकार श्री नागराज भाऊ पाटील श्री साहेबराव वामन तावडे विश्वंभर सूर्यवंशी प्रमुख बळीराम पाटील किरण तावडे अनिल बोरसे किरण सोनार स्वप्नील बाविस्कर योगेश सूर्यवंशी अमोल सूर्यवंशी ही पंढरीनाथ पाटील पालक समितीचे अध्यक्ष श्री धनगर श्री राजेंद्र पाटील गणेश पाटील सुनील पाटील ग्रामपंचायतचे सदस्य सीमा पाटील संस्थेच्या संचालिका सो मनीषा तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाल्मीक पाटील श्री विलास गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सुधाकर सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन अमोल तावडे यांनी केले स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.