पाचोरा ( प्रतिनिधी ) ;- जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती व डॉ. भूषण मगर मित्र मंडळ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जाहीर कीर्तन जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रीय कीर्तनकार शिवभक्त पारायण *ह भ प गंगाधर महाराज कुरुंदकर हिंगोली यांचे दिनांक 2 फेब्रुवारी 2021 मंगळवार रोजी वेळ रात्री ८ वाजता जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व संत प्रेमी भाविक भक्तांनी सहकुटुंब इष्टमित्रांसह किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती किर्तनाचे ठिकाण मुंजोबा मंदिर कृष्णापुरी कॉर्नर आठवडे बाजार पाचोरा जिल्हा जळगाव आयोजक जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती व डॉक्टर भूषण दादा मगर मित्र मंडळ पाचोरा यांनी केले आहे .








