पाचोरा (प्रतिनिधी ) ;- पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्यालाभ मिळावा या सह विविध मागण्यांसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अमान मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी केळी, मोसंबी, लिंबू इ. फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असून शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत सदरील फळ पिकांचा विमा देखील उतरवलेला आहे.तरी देखील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याने विविध गावांतील शेतकऱ्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत कळविले.
याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्याकडून माहे मार्च एप्रिल व मे २०२३ चा हवामानाचा अधिकृत अहवाल (महावेध) नुसार याठिकाणी पाचोरा व भडगाव तालुक्यातील केळी लागवड असलेले बहुतांश महसूल मंडळ जास्त च्या तापमानामुळे झालेल्या नुकसानी पात्र ठरलेले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यानुसार अमोल शिंदे यांनी सदरचे स्वयंचलित हवामान यंत्र असलेले ठिकाण याची पाहणी केली असता बहुतांश हवामान केंद्र हे नागरी वस्तीत असून काही ठिकाणी सदरील हवामान केंद्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत.
यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार व शेतकरी यांनी सदरील पिक विमाचा हप्ता भरून देखील सदरील यंत्रणा नादुरुस्त असल्याने शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत.असे अमोल शिंदे यांच्या निदर्शनास आले.
यासंदर्भात त्यांनी तात्काळ खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमोल शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांची तसेच नादुरुस्त स्वयंचलित हवामान यंत्र याबाबतीत सविस्तर महिती देऊन यासंदर्भात स्वयंचलित हवामान यंत्र उभारणी केलेल्या कंपनी सोबत बैठक लावून इतर महसूल मंडळांप्रमाणे पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र न ठरलेल्या महसूल मंडळांना देखील पीक विम्याची नुकसान भरपाई अदा करण्याबाबत सूचना द्याव्यात जेणेकरून मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांचे स्वयंचलित हवामान केंद्र नादुरुस्त असल्याने होत असलेले नुकसान भरपाईच्या माध्यमातून कमी करण्यास मदत होईल.अश्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी यावेळी केल्या.
याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे,भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील,मा.सभापती बन्सीलाल पाटील,प्रदीप पाटील,सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या बाबत पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.