पाचोरा (प्रतिनिधी ) – पाचोरा शहरातील बोहरा समाजातर्फे ,मोहम्मद पैगंबर साहब ,स.अ. ,याचा जन्म दिना निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मोहम्मद पैगंबर
जन्मदिनानिमित्त बोहरा गल्ली येथून पाचोरा बोहरा समाजाचे अध्यक्ष अब्दुल कादरभाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीमध्ये श्री कासम भाई लाकडावाला ,शब्बीर भाई लोखंडवाला, हातिम भाई लाकडावाला शब्बीर भाई बोहरी तसेच पाचोर्यातील सर्व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व विविध पक्षाचे पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी झाले रॅलीमध्ये लहान मुलांनी , शिक्षणा, वर आधारित विविध प्रकारचे बॅनर हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते कार्यक्रमाची सांगता बोहरी मज्जिद येथे झाली तेथे कुराण पठणाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमांमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे बोहरा समाजातर्फे सत्कार व आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्वी ते साठी बुऱ्हानी गार्डसचा सभासदांनी परिश्रम घेतले बुरहानीचे सभासद विविध ड्रेस कोड मध्ये उपस्थित होते