पाचोरा (प्रतिनिधी);- 6 जुलै 2021 रोजी राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्यकारिणी सभा पुणे येथे माजी केंद्रीय मंत्रीविजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेला राज्याच्या आठही विभागाचे कार्यकारिणी समितीचे प्रत्यक्ष 19 सदस्य व ऑनलाईन वेबिनार पध्दतीने 12 सदस्य सहभागी झाले होते. राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीच्या अजेंडयानुसार सर्व 11 विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या विषयांमध्ये शिक्षण संस्थेच्या दैनंदिन, प्रशासकीय समस्याबाबत सखोल चर्चा झाली. शिक्षणसंस्थांना मिळणारे वेतनेत्तर अनुदान बंद करण्यात आलेले आहे. या संदर्भात मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथील न्यायालयात याचिका दाखल करुन वेतनेत्तर अनुदानाबाबत मा.न्यायालयाने शासनाला आदेश देऊनही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवमान याचिका दाखल करुन सुध्दा शासनाकडुन वेतनेत्तर अनुदान प्राप्त होत नाही म्हणुन आंदोलन करावे असे एकमत झाले. त्याप्रमाणे शिक्षकेत्तरांची भरती प्रक्रिया ठेकेदारी (Contract) पध्दतीने करावी हा आदेश रदद करण्यात येऊन पुर्वी प्रमाणेच शिक्षकेत्तर भरतीचा निर्णय घ्यावा तसेच शिक्षक भरती बाबत प्रवित्र पोर्टल व्दारे भरती करावी असा निर्णय घेतला आहे. मात्र पवित्र पोर्टलवर विश्वासअर्हता राहिलेली नाही. अभियोग्यता चाचणी परिक्षेत अनेक गैरप्रकार उघडकिस आलेले आहेत. हे शिक्षण क्षेत्रासाठी योग्य नाही म्हणुन पवित्र पोर्टलव्दारे भरती प्रक्रिया रदद करावी असा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला इ. 5 वी चा वर्ग जि.प.शाळांना जोडण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा पुर्वपार खाजगी अनुदानीत शाळांनसाठी इ. 5 वी ते 10 वी धोरण कायम ठेवावे. त्यामुळे 5 वी ते 10 वी पर्यंत्त माध्यमिक शाळेचा दर्जा टिकुन राहील व शैक्षणिक गुणवत्ता जोपासली जाईल. या प्रमाणे जवळपास 11 विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट राज्य शिक्षणसंस्था महामंडळाला श्री.छत्रपती शिवाजी महाराज राष्टीय स्मारक समिती, नवी दिल्ली मार्फत निधी पुरवण्यात आला असुन कोरोना सारख्या महामारीच्या रोगाचा प्रार्दुभाव नष्ट करण्यासाठी विदयार्थ्यांमध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणा-या आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती व्हावी. शाळा -महाविदयालयात औषधी वनस्पतींचे उदयान तयार करण्यात यावे यासाठी मोफत वनस्पतींचे वाटप करण्यात आले. याबाबत महामंडळ तथा छ.शिवाजी राष्टीय समितीचे अध्यक्ष .विजय नवल पाटील व कार्यकारिणीचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. शिक्षण संस्था महामंडळाचे सुर्वण महोत्सवी अधिवेशन कोरोनाच्या प्रार्दुभाव संपल्यावर सांगली येथे घेण्यात येईल. त्यासाठी समिती तयार करण्यात आली. अधिवेशन आयोजनाची जबाबदारी महामंडळ कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी स्विकारली महामंडळाला आर्थिक द़ष्टया उर्जित अवस्था येणे साठी सभासद वर्गणी वाढविण्यात आली. मालमत्ता कर आकारणी बाबत मा.न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही होत नाही म्हणुन शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. शिक्षणसंस्था महामंडळाच्या या प्रश्नांनबाबत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करुन मा.अजितदादा पवार, मा.वर्षाताई गायकवाड, मा.एकनाथजी शिंदे या मंत्री महोदयांन बरोबर बैठक करण्यात येईल. त्याचे नियोजन करण्यात आले बैठकित अध्यक्ष श्री.विजय नवल पाटील, उपाध्यक्ष मा.अशोक थाोरात, कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील, अजित वडगावकर, एस.पी.जवळकर, अप्पा बालवडकर, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर वेबिनार व्दारा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार मा.किरण सरनाईक, मिलींद पाटील, वसंतराव घुई, रविंद्र फडणविस, अरविंद लाठी यांनी सहभाग घेतला आभार अशोकजी थोरात यांनी मानले तर बैठकीचे संयोजन सचिन बोरसे, एन.डी.नांद्रे, वाल्मिक सुरासे, मनोज पाटील यांनी केले.