पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल पाचोरा. येथे सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ताईसाहेब प्रमिला वाघ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना पेपर देऊन चित्र काढण्यास विषय देण्यात आले विद्यार्थी आवडीने चित्र काढत होती व रंगकाम करत होती विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी सकाळ पेपरचे बातमीदार पाचोरा प्रतिनिधी प्राध्यापक सी.एन. चौधरी सर शाळेचे कलाशिक्षक सुनील भिवसने सर, प्रमोद पाटील, सुबोध कां तायन सर, ज्योती ठाकरे मॅडम उपस्थित होते. यावेळी शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.