पाचोरा (प्रतिनिधी) – स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून रंगांची उधळण केली.
निर्मल फाउंडेशनचे अध्यक्षा सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून रंगभरण स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेसाठी वर्गनिहाय वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते इ.१ ली ते ४ थी साठी ‘अ’ गट,इ.५ वी ते ७ वी करिता ‘ब’ गट,इ. ८ वी ते १० वी साठी ‘क’ गट आणि इ. ११ वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ड’ गट असे वर्गीकरण करण्यात आले होते. स्पर्धेला *सुमारे १०५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन खूप महत्त्वाचे असते असे म्हणाल्या .
याप्रसंगी शिवसेनेचे उद्धव मराठे, दीपक राजपूत, रमेश बाफना, शरद पाटील, सुनील सावंत, दीपक पाटील, संदीप जैन, हरेश देवरे, प्रशांत पाटील, .जगदीश महाजन, फकीरचंद पाटील दत्ताभाऊ जडे अभिषेक खंडेलवाल. कृष्णा व्यास, किरण पाटील प्रतीक पाटील, माजी नगरसेवक दादा चौधरी,दत्त जडे, आनंद संघवी, बंडू पाटील, आदी पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि विविध शाळेतील कला शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रास्ताविक नाना वाघ यांनी क तर आभार फकीरचंद पाटील यांनी मानले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि.२८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजटा शिवतीर्थ जय किसान कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथे करण्यात येणार आहे. असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे .