पाचोरा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे 25 ते 30 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय गोर बंजारा समाजाच्या कुंभ मेळाव्याचे आयोजक केले असून बंजारा समाज केंद्रस्थानी असलेल्या या मेळाव्याला देशभरातून शंभरहून अधिक संत महंत व देशातले नेतेमंडळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात राज्यभरातून लाखो समाज बांधव येणार असून पाचोरा – भडगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी या महामेळाव्यास बहुसंख्येने सहभागी होऊन इतिहासिक साक्षीदार व्हावे असे आवाहन शहर अध्यक्ष राहुल प्रेमाभाऊ राठोड यांनी केले आहे
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे 25 ते 30 जानेवारीदरम्यान अखिल भारतीय गोर बंजारा समाजाच्या कुंभमेळाव्याचे आयोजन केले आहे दरम्यान या महामेळाव्यास देशभरातून शंभरहून अधिक संत महंतांची उपस्थिती लाभणार आहे समाजांच्या विकासासाठी या मेळाव्यातून प्रबोधन केले जाणार आहे हा मेळावा ऐतिहासिक तक्ता न भूतो न भविष्याती होणार असून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समाज बांधव दिवस रात्र प्रयत्न करीत आहे या ऐतिहासिक अशा महामेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून गोर बंजारा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत या अनुषंगाने पाचोरा भडगाव बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहावे राहुल राठोड यांनी महा कुंभ मेळाव्यात सहभागी होण्याचे समाज बांधवांना आवाहन केले आहे.