फैजपूर ( प्रतिनिधी ) – माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनल रवी चिमणकर (वय-२९ , रा. फैजपूर ता. यावल ) यांचा विवाह मध्यप्रदेशातील रवि जानकर चिमणकर ( रा. बाणगंगा, भोपाल ) यांच्याशी झाला. २४ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत पती रवी चिमणकर यांने विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण केली. सासू, सासरे, तीन नंदा यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तू पैसे आणले नाही तर तुला नांदविणार नाही अशी धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता फैजपूर येथील माहेरी निघून आल्या.मंगळवारी फैजपूर पोलीसात तक्रार दिली. फैजूपर पोलीस ठाण्यात पती रवि चिमणकर, सासू इंदूबाई चिमणकर, सासरे जानकर चिमणकर (सर्व रा. भोपाल) , नणंद राखी खिरोडकर (रा. रायपूर छत्तीसगड) , लता वानखडे ( रा. जळगाव) , माया साखरे ( रा. शेंदुणी जामनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहेत.