पाचोरा (प्रतिनिधी) – कृष्णापुरी हिवरा नदीवरील पूल व महात्मा ज्योतिबा फुले स्मारकचा विषय मार्गी लावल्या बाबत आमदार किशोर पाटील यांचा महात्मा सेवा फाऊंडेशनच्या वतीने सत्कार!
पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार महात्मा सेवा फाऊंडेशनच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील मुख्य रहदरीचा मार्ग असलेल्या कृष्णापुरी हिवरा नदीवरील पुलाचे काम नागरिकांची गैरसोय लक्षात घेता कमित कमी वेळात काम पूर्ण करून कृष्णापुरी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या – जाणाऱ्या सर्वत्र नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय आता थांबली आहे. नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा कायमचा विषय मार्गी लागला असून त्याच बरोबर तब्बल ३० वर्षपेक्षा जास्त कालावधी पासून प्रलंबित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे विषय देखील आमदारांनी मार्गी लावून तमाम बहुजन समाजाच्या भावनांचा आदर केला आहे याबाबत तुमचे कितीही कौतुक केले तरी ते कदापी कमीच असेल म्हणूनच बहुजन समाजाचा एक घटक तसेच महात्मा सेवा फॉउंडेशन या संस्थेचा अध्यक्ष राहुल बाबुलाल महाजन यांनी किशोर पाटील यांचे जाहिर आभार व्यक्त करीत आज तलाठी कार्यालय उदघाटन प्रसंगी आमदार किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी पाचोरा तालुक्याचे प्रांत अधिकारी श्री विक्रम बांदल, मंडळ अधिकारी पाचोरा श्री वरद वाडेकर, प्रतीक्षा मनोरे, तलाठी श्री आर डी पाटील, श्री मयूर आगरकर पुरवठा विभाग श्री अभिजीत येवले, श्री विजय येवले, श्री डहाके मंडळ अधिकारी तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख श्री संजय गोहिल, श्री किशोर भाऊ बारवकर, श्री बंडू चौधरी, श्री शरद पाटे, श्री राजेश पाटील, श्री प्रवीण ब्राह्मणे, श्री प्रवीण पाटील, श्री पंढरीनाथ पाटील, श्री गजानन पाटील, श्री पिंटू शिंदे, श्री राज अमृतकर, श्री पिंटू प्रजापत, श्री अक्षय जैन, श्री संदीप राजे पाटील, श्री बापू हटकर श्री बंडू जगताप तसेच आदी शिवसैनिक व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.