वरणगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा शिवारातून महावितरण कंपनीच्या २६ हजार ६४० रूपये किंमतीच्या वीज तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओझरखेडा शिवारात महावितरण कंपनीच्या मालकीचे २६ हजार ६४० रूपये किंमतीचे लघुदाब विद्यूत वाहिनीचे सहा गाळ्याचे वीज वाहक तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीला आले आहे. वरीष्ठा तंत्रज्ञ रविंद्र जवरे (वय-३२ , रा. हरताळा ता. मुक्ताईनगर ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहेत.







