जळगाव (प्रतिनिधी) – औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.52 (Old NH- 211) या महामार्गावर चाळीसगाव (औट्रम) घाटातील साखळी क्र. 379.760 ते 388.000 मधील रस्त्यावर खड्डे पडलेले असुन वाहतुक कोंडी व अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविणे/दुरुस्तीचे काम रविवार, दि. 11 ऑक्टोंबर, 2020 रोजी हाती घेण्यात येणार असल्याने एका दिवसासाठी सदरील रस्त्यावरील वाहतुक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.
या काळात सर्व प्रकारच्या वाहनासाठी वळणमार्ग खालीलप्रमाणे
1. धुळेकडून औरंगाबादकडे येणारी वाहतुक ही धुळे – मालेगांव- नांदगांव- शिउर बंगला- देवगांव रंगारी मार्गे औरंगाबाद,
2. चाळीसगावकडून औरंगाबादकडे येणारी वाहतुक ही चाळीसगाव – नांदगांव- शिउर बंगला- देवगांव रंगारी मार्गे औरंगाबाद,
3. औरंगाबाद कडून चाळीसगाव व धुळे कडे जाणारी वाहतुक ही औरंगाबाद – देवगांव रंगारी- शिउर बंगला- नांदगांव मार्गे चाळीसागांव व धुळे कडे जातील. असे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.