जळगाव जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत डिसेंबर महिन्यात एकूण ५१ बालकांना त्यांचे कायदेशीर पालक शोधून त्यांच्या हवाली करण्यात आले आहे. हि कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पीएसआय दीपाली पाटील यांच्या पथकाने सामाजिक संस्थांसोबत केली आहे.
ऑपरेशन मुस्कान-१३ ही शोध मोहीम दि. ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जळगांव जिल्हा पोलीस दलाचे अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, प्रभा. पोलीस उप अधीक्षक (गृह) संदिप गावित यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्षातील अधिकारी पोउपनि दिपाली पाटील व अंमलदार सफौ विठ्ठल फुसे, मसफौ/ निलीमा हिवराळे, सफी/ रविंद्र गायकवाड, पोहेकों/ अनिल पाटील पोहेकों/ दिपक पाटील, मपोहेको मनिषा पाटील, मपोना वहीदा तडवी, तसेच जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्प, आदर्श बहुउद्देशीय संस्था जळगाव यांचे मार्फत राबविण्यात आली.
सदर मोहीमे दरम्यान मुलांचे आश्रयगृह, अशासकीयसंस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यातील भिक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले अथवा कचरागोळा करणारी मुले, धार्मीकस्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने, सिग्नल, मार्केट व इत्यादी ठिकाणी काम करणारी व भिक मागणारी लहान मुले अशा मुलांना हरविलेले मुले समजुन त्यांचे फोटो घेवुन त्यांची माहीती अद्ययावत करुन त्यांना त्यांचे आई- वडील किवा कायदेशीर पालक तसेच अनाथ ज्या मुला/मुलींना कोणीही नातेवाईक नाही अशा मुला/मुलींना बाल कल्याण समिती जळगाव यांचे कडे सुपुर्द करावे असे आदेशित करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, जळगाव यांचे मार्फत नियुक्त केलेल्या स्वतंत्र पथकाव्दारे डिंसेबर २०२४ या महिन्यात “ऑपरेशन मुस्कान-१३” ही मोहीम जळगाव जिल्ह्यात राबविलेली असुन एकुण ५१ बालके (मुले-३२ व मुली -१९) त्यांचे फोटो घेवुन माहीती अद्ययावत करुन त्यांचे घरी नेवुन त्यांचे त्यांचे आई- वडील त्यांचे कायदेशीर पालक यांचे कडे सुपुर्द करण्यात आलेले आहेत.