जळगाव (प्रतिनिधी)- रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून पेन्शन अदालत १५ डिसेंबर रोजी आयोजित असून त्यासाठी तक्रारींचे अर्ज ३१ ऑक्टोबर पर्यंत सादर करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पेन्शन अदालत भुसावळच्या मंडल रेल प्रबंधक कार्यालयात ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारकांनी मोबाइलवर संपर्क करावी. ई-मेलच्या द्वारे निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे शासनाच्या वर्तमान दिशा निर्दशानुसार तत्परतेने निराकरण केले जाईल. मध्य रेलवेच्या भुसावळ विभागातुन जे कर्मचारी सेवानिवृत झालेले आहेत त्यांनी आपल्या तक्रारीचे अर्ज वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी,भुसावळ यांना ऑनलाईन ई-मेल – pensionadalat2020@gmail.com वर सादर करावेत. अर्जात आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरूप इत्यादी नमूद करावे. अर्जासोबत पास बुक ची झेरॉक्स ,पीपीओ ची झेरॉक्स ,आधार कार्ड ची झेरॉक्स स्वतः सत्यापित करून पीडीएफ फाईल मध्ये उपरोक्त ई-मेल वर पाठवावे .
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर राहील. असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.