जळगाव (प्रतिनिधी) – येथील गणेशवाडी परिसरातील महिलेला अज्ञात व्यक्तीने इंटरनेटवरून नंबर शोधून काढीत दिशाभूल करून डेबिट कार्डवरील नंबर मागितला. त्याद्वारे त्याने वेळोवेळी खात्यातून रक्कम काढून ९२ हजार ६७१ रुपयांची महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रारी अर्ज आज देण्यात आला आहे.

शहरातील गणेशवाडी येथील रहिवासी सीमा राजेश शर्मा यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे याना भेटून तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे कि, माझ्या अकाऊंटची माहिती घेण्याकरिता अज्ञात व्यक्तीने इंटरनेटवरून नंबर शोधीत फोन लावला. समोरच्या व्यक्तीने डेबिट कार्डवरील सीआरएन नंबर मागितला. तो दिला असता वेळोवेळी खात्यातून एकूण ९२ हजार ६७१ रुपये काढण्यात आले आहेत. तरी मला न्याय मिळावा अशी विनंती सीमा शर्मा यांनी केली आहे. याबाबत महिलेने तक्रारी अर्ज पोलीसात दिला आहे.







