जळगाव ( प्रतिनिधी ) – ओबीसी आरक्षणाबद्दलच्या महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेचा निषेध करीत आज आंदोलन करून जिल्हा आणि शहर भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भाजपा ओबीसी मोर्चा जळगाव महानगर आणि जिल्हा ग्रामीणतर्फे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी , ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले . महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ उज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष सौ रेखा पाटील, दिप्ती चिरमाडे, महिला सरचिटणीस रेखा वर्मा, क्रीडा आघाडीचे अरुण श्रीखंडे, ओबीसी उपध्यक्ष तृप्ती पाटील, चंदु महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे ,युवा मोर्चाचे शुभम बावा, युवा मोर्चा सरचिटणीस मिलींद चौधरी, जितेंद्र चौथे, सचिन बाविस्कर, प्रथम पाटील, रितेश सोनवणे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.