ख्वाजा नगरातील अनेक नागरिकांना पोहचली इजा
जामनेर(प्रतिनिधी ) पहूर येथे १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आईस फॅक्टरीत अचानक अमोनिया वायूची गळती झाल्याने येथील ख्वाजा नगर परिसरातील अनेक नागरीकांच्या डोळ्यात अमोनिया वायू गेल्याने इजा होवून श्वास घेण्यास त्रास झाला . त्यामुळे अनेकांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहीजण पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहे.
पहूर येथील आईस फॅक्टरीत अचानक स्फोट झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याच वेळी मुस्लिम समाजातील मयत झालेल्या महिलेला कब्रस्थानमध्ये ठेवून परतत असतांना या स्फोटमुळे वाकोद रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या डोळ्यात अमोनिया वायू गेल्याने सर्वजण सैरावैरा धावत सुटले. . यात अनेकांना इजा झाली . यात सरपंच अफजल तडवी, शाकीनाबी सलीम खान पठाण्या यांच्यासह सात जणांची प्रकृतीअस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातउपचार करण्यात आले तर काही जणांवर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोनिया वायूची गळती नक्की कशी घडली, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.