जळगाव आगाराला मिळाल्या मिळाल्या ५ बस
जळगाव (प्रतिनिधी) : एस टी महामंडळाकडून विविध विभागांना नवीन बसेस देण्याची प्रक्रीया सुरु आहे. जळगाव विभागातील जळगाव आगाराला गुरुवार दि. १० एप्रिल रोजी पाच नवीन बसेस मिळाल्या. या नवीन बसेसचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव विभागातील गाड्यांच्या ताफ्यात आतापर्यंत एकूण ४५ नवीन बसेस मिळाल्या असून अजून ६५ गाड्या येणे बाकी आहे. आता जळगाव विभागात एकूण गाड्यांची संख्या ७५५ झालेली आहे. जळगाव व चोपडासह ११ तालुक्यांतील १० ठिकाणी नवे बसस्थानक उभारण्यासाठी जागा निश्चित झाली आहे.
यासाठी परिवहनमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून मंजुरीची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी विभाग नियंत्रक भगवान जगनोर, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, यंत्र विभाग प्रमुख अभियंता किशोर पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.