जळगाव ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामबंद आंदोलन करणार्या कर्मचार्यांना शनिवारी थेट खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची बैठक घेऊन हा तिढा सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादीच्या महानगर जळगाव पदाधिकार्यांनी हा संवाद घडवून आणला.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कर्मचार्यांनी सातवा वेतन आयोगासह विविध मागण्यासांठी कृती समितीमार्फत 24 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास राष्ट्रवाीदी काँग्रेसच्या महानगर पदाधिकार्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. कर्मचार्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयी कृती समितीने विविध मागण्यासांठी 18 सप्टेंबरला आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरू आहेत. त्यात शनिवारी राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील,सचिव कुणाल पवार, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, व पदाधिकार्यांनी विद्यापीठात जावून या कर्मचार्यांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांचा व खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईलवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद घडवून आणला. खासदार सुळे यांनी पंधरा मिनिटांपर्यंत कर्मचार्यांशी संवाद साधून येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व विद्यापीठातील पाच कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा तिढा सुटण्याची चिन्हे .आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहरचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, सचिव कुणाल पवार, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे समन्वयक रमेश शिंदे, दुर्योधन साळुंखे, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, सौ मांडोळे आदी उपस्थित होते.








