जळगाव (प्रतिनिधी) – येथील बी. एच. आर. पतसंस्थेच्या अपहार व घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी या उद्योजकाला आज सोमवार ३० रोजी संध्याकाळी पुण्यातुन चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त असून याबाबत माहिती मिळाली आहे.

याबाबत तपास अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. सदर पारस ललवाणी यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सोसायटी या पतसंस्थेतील काही प्रोपर्टी विकत घेतले असल्याचे समजते.
याबाबत त्यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे. जितेंद्र कंडारे, सुनील झवर यांसह काही संशयित फरार झालेले आहेत. सदर प्रकरणात मोठमोठे लोकांचा समावेश आहे. असा गौप्यस्फोट आज दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.







