जळगाव – गिरणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज दि. 20 सप्टेंबर रोजी गिरणा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली आहे. पुढील काही तासांमध्ये गिरणा नदीपात्रात गिरणा धरणांमधून 50 हजार क्युसेकपर्यंत पाणी प्रवाह सोडण्यात येऊ शकतो.

तरी पुढील चोवीस तासापर्यंत गिरणा धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी गिरणा नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे.







