जळगाव (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर झालेल्या विचित्र अपघातात दाम्पत्य ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून एमआयडीसी पोलीस घटनास्थळी माहिती घेत आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सकाळी भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. आज बुधवारी 14 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास देखील भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांची गर्दी झाली होती. जळगाव कडून एमायडीसी कडे जात असलेली दुचाकी क्रमांक .एम.एच.19 ए.डब्ल्यू. 7962 ला समोरून येणाऱ्या मालवाहू छोटा हत्ती वाहनाने धडक दिली. त्यात मागून आणखी एक मालवाहू टाटा मॅजिकदेखील येत होती. ती देखील धडकली. या जोरदार धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले तर या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला. यात दुचाकीवरील रामलाल केवट व पत्नी नेबा उर्फ सुबा रामलाल केवट रा. सिंधी काँलनी कवरनगर हे दाम्पत्य ठार झाले आहे. तर मयत रामलालचा भाऊ दीपक शहादूलाल केवट हा गंभीर जखमी झाले असुन त्याच्यावर डॉ उल्हास पाटील हाँस्पिटल येथे उपचार सुरु आहे.
सकाळी घटनास्थळी एमआयडीसी पोलीस तात्काळ पोहोचल्याने त्यांनी वाहतूक सुरळीत केली व जखमीना दवाखान्यात पाठविण्यात आले होते. आता दोन्ही मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती एमआयडीसी पोलीस घेत आहेत.