भुसावळ :- शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या वाढलेल्या प्रमाणानंतर यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी एकाचवेळी शहर, बाजारपेठ व तालुक्यातील १३ भंगार व्यावसायीकांच्या गोदामांची तपासणी केल्याने भंगार व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी दुचाकी, तीन चारचाकीचे लाखो रुपयांचे स्पेअर पार्टस् जप्त केले आहे.
भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुक पोलिस ठाणे हद्दीत राहणार्या 13 भंगार व्यावसायीकांकडे पोलिसांनी एकाचवेळी दहा पथकांच्या माध्यमातून तपासणी केली. पोलिसांनी तीन बंद चारचाकी, दोन रीक्षा, 20 दुचाकी, दोन दुचाकींचे इंजिन, 45 इलेक्ट्रीक मोटार बॉडी, चार व्हील डिस्क, आठ पाईप, दोन अँगल, दोन नवे तार बंडल, तीन जनरेटर व एक सीपीयु आदी संशयीत मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित गोदाम चालकांना याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.