प्रशासनांचा कानाडोळा ; ग्रामस्थांनकडून कारवाईची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे वाळू माफियांचा हैदोस सुरू असल्याची माहिती काही ग्रामस्थांकडून मिळाली असून याकडे प्रशासनांचा मात्र कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे.
शिरसोली, दापोरा, कु-हाळदे, लमांजन व नागझरी शिवारातून तसेच आजूबाजूच्या गावांमधून वाळूची सर्रास वाहतूक होत आहे मात्र या वाळूच्या ट्रॅक्टरची तपासणी करण्यासाठी तलाठ्यांचे पथक आहे कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. नुकतीच वावडदा येथे तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. वाळू माफियांवर कुठलेच अंकुश राहत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून मागील महिन्यात आव्हाने येथे शेतकऱ्यांनी नदीत बसून सत्याग्रह केला होता. मात्र तरीही जळगाव तालुक्यातील वाळू माफियांचा प्रश्न सुटलेला दिसत नसून जळगाव जिल्ह्यात देखील सुरू असलेला वाळू चोरट्यांचा धुमाकूळ कधी थांबेल हादेखील खरा प्रश्न आहे.
आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसीलदार यांच्या बैठका घेऊन स्पेशल फोर्स तयार करून वाळू माफियांवर अंकुश आणावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. शिरसोली गावा बाहेर चोरटी वाहतूक करुन वाळूचे ठिय्या मारले असल्याचे पण लोकांच्या नजरेत आले आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन कारवाई करावी असी मागणी परीसरातील नागरिकांनकडून होत आहे..