जळगाव (प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने टेंडर प्रक्रिया राबविली असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सिनेट सदस्य शिवसेनेचे विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे अँड. कुणाल पवार ,काँग्रेसचे देवेन्द्र मराठे आणि अँड. अभिजित रंधे यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि उमाविमधील डीएम इंटरप्राइजेस आणि साई मल्टी सर्व्हिसेस यांच्या टेंडर प्रक्रियेच्या अग्रीमेंटची माहिती २२ जानेवारी २०२२ पर्यंत सादर केलेली नाही. विद्यापीठात ठेकेदाराविषयी कागदपत्र न सादर करता त्यास चुकीच्या पद्धतीने ठेके दिले गेले आहे. कर्मचारी आणि कामगारांचे वेतन ठेकेदाराकडून कमी केले जात आहे. तसेच विद्यापीठात रंगकाम सुरु केले आहे. यांचेदेखील कागदपत्रे आणि ठेकेदारांची नावे नाहीत . यात काही आर्थिक व्यवहार केले जात असल्याची शंका असून याबाबत चौकशी करण्यात यावी , हा प्रकार गंभीर असून आर्थिक दिवाळखोरीकडे विद्यापीठाला घेऊन जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.