• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्य दीक्षांत समारंभाची तयारी पूर्ण – प्रा. ई. वायुनंदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ सोमवार, दि.३ मे, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन संपन्न होत असून, या समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.

या दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी राहणार असून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हया दोन्ही मान्यवरांचा दीक्षांत समारंभातील पदवीधरांशी होणारा संवाद हा निश्चित आगळा-वेगळा राहील असे प्रा.ई. वायुनंदन यांनी सांगितले.

या दीक्षांत समारंभासाठी ४९ हजार ७५३ इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र असून त्यापैकी नोंदणी केलेल्या२८ हजार ९८ स्नातकांना या दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक. चे ४३७ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे.

या पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या सहाय्याने मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राम मुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे.

तसेच सदर समारंभ ऑनलाइन असल्याने स्नातकांना ऑनलाईन उपस्थिती देता येणार आहे. त्याकरीता स्नातकांसाठी विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in वर लिंक दि. ३ मे २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता उपलब्ध होईल. तसेच संस्थाचालक, प्राचार्य, प्रशाळा संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक हे या समारंभामध्ये याच लिंकव्दारे ऑनलाईन कार्यक्रम पाहू शकतात.

९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झालेले असून (यात ६६ विद्यार्थिनी आणि ३३ विद्यार्थी यांचा समावेश आहे), सुवर्णपदक प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. सध्याची कोविड प्रार्दूभावाची परिस्थिती लक्षात घेऊन या दीक्षांत समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाव्दारे पाठविले जाणार आहे. तसेच सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनाही या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार नाही. त्याबाबतची माहिती या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या कळविली जाईल. तसेच अधिकची माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याकरीता विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.

या पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी.पाटील उपस्थित होते.


 

 

Previous Post

सकारात्मक विचारांनी करोना विरुध्य लढाई आपण सहज जिंकू. – सिस्टर बीके शिवानी

Next Post

मसाप जळगाव शाखेची कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मसाप जळगाव शाखेची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon