जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे नवीन परिणाम या विषयावर सात दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली.
दि.२० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत कोरोना काळात भारताने कोविड डिप्लोमेसीच्या माध्यमातून जागतिकस्तरावर गरजु राष्ट्रांना दिलेल्या वैद्यकीय मदती मुळे निर्माण झालेली प्रतिमा यावरही कार्यशाळेत चर्चा झाली. भारत-चीन सैन्यातील वाढता लष्करी तणाव, सीमा विवाद, चिनचे विस्तारवादी लष्करी धोरण,चिन आणि पाकिस्तान दरम्यान वाढणाऱ्या सामरिक संबंधाचे राष्ट्रीय सुरक्षा धोरणा होणारे परिणाम आदी विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चासत्रात डॉ.लियाकत खान, डॉ.विजय खरे, ब्रिगेडीअर हेमंत महाजन, मोहम्मद मुदस्सर कमर, रोहन चौधरी, डॉ. दिलीप मोहिते, डॉ.नंदकिशोर कुमार यांनी आपली मते मांडली. प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी समारोप केला. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ.अनिल चिकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेत ५६० जण सहभागी झाले होते. डॉ.सुभान जाधव,डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, प्रा.सुशील पवार, डॉ.सुभाष देवरे, प्रा.विलास कुमावत, हर्षल पाटील, निलिमा म्हस्के, विजय पाटील, सचिन चव्हाण, प्रशांत साळुंखे, डॉ.तुषार रायसिंग यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.