जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील दादावाडी परिसरात श्रीराम नगरातील निवृत्त सहाय्यक फौजदाराचे बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी ४७ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी दि. २६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रकांत माधवराव बडगुजर हे श्रीराम नगरात पत्नी लताबाईसह वास्तव्यास आहेत. ते दोघे १४ सप्टेंबर रोजी रावेर येथे शिक्षक असलेल्या पंकज या मुलाच्या घरी गेले होते. गुरुवारी दुपारी बारा वाजता त्यांना शेजारी राहणार संगीताबाई यांनी फोन करून बडगुजर यांच्या घरातील लाईट सुरु असून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. (केसीएन)बडगुजर हे पत्नी मुलासह दुपारी दीड वाजता घरी पोहोचले. त्यांना घराचा मुख्य दरवाजाचे कुलुप तुटुन ते जिन्याखाली टाकलेले दिसले. हॉलमधील गोदरेज कपाटातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
तसेच कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रुपये दिसुन आले नाही. ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची पोत, १० हजारांच्या चांदीच्या वस्तु, गणपतीची चांदीची मुर्ती २, चांदीची लक्ष्मी, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, पायातील जोडवे, १४ पाचशे रुपयांच्या १४ नोटा अशी ७ हजाराची रोकड एकूण ४७ हजारचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.