मुंबई ( वृत्तसंस्था ) – ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. मात्र आयसीसीच्या संघात दोनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू एडम झाम्पा यांचा समावेश आहे.
याचबरोबर सेमी फायनल मध्ये पोहचलेल्या दक्षिण अफ्रिकेचे दोन खेळाडू या संघात आहेत. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि अष्टपैलू खेळाडू जेराल्ड कोट्झी (12 वा खेळाडू) यांचा समावेश आहे. याचबरोबर न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलचा आणि श्रीलंकेच्या दिलशान मधुशंका यांचा देखील संघात समावेश आहे.
आयसीसीचा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा सर्वोत्तम संघ –
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक) (द. आफ्रिका), रोहित शर्मा (कर्णधार) (भारत), विराट कोहली (भारत), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड), केएल राहुल (भारत), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रविंद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), ऍडम झम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शमी (भारत), गेराल्ड कोएट्झी (१२ वा खेळाडू), (द. आफ्रिका)