मुंबई ( वृत्तसंस्था ) — जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख ५ ऑक्टोबर असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं स्पष्ट केल्यानंतर या निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता होती. त्यात न्यायालयानं ४८ तासांमध्ये तारीख जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर कोणत्याही क्षणी ही घोषणा होण्याची शक्यता होती. त्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातली घोषणा केली असून पुढील महिन्यात मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.







