प्रभागातून प्रचारफेरीला प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी

येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग १२ मध्ये महायुतीचे उमेदवार नितीन बरडे यांच्या प्रचारफेरीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचारफेरीमध्ये नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.
श्रद्धा कॉलनी, साने गुरुजी नगर, टेलिफोन नगर या प्रभागातून नागरिकांना आवाहन करीत प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत नागरिकांचा भरभरून आशीर्वाद नितीन बरडे यांनी घेतला. प्रचार दौरा सुरू होताच समर्थकांनी घरोघरी जाऊन आवाहन केले. या रॅलीने प्रभागातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले. रॅली दरम्यान नितीन बरडे यांनी प्रभागातील घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ठिकठिकाणी महिलांनी या उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. प्रभाग १२ मधील नागरी समस्या आणि विकासाचे मुद्दे घेऊन उमेदवार नितीन बरडे हे रिंगणात उतरले आहेत.










